Moshi crime news : सीएनजी पंपावर भांडण; रिक्षा चालकास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : रिक्षामध्ये सीएनजी भरण्यासाठी गेलेल्या एका रिक्षा चालकाला दोघांनी बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 15) रात्री सव्वादहा वाजता काजळे एंड सन्स पेट्रोल पंप मोशी येथे घडली.

गोविंद गौतम निसरगंध (वय 27, रा. बो-हाडेवाडी, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल दरेकर आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षा चालवण्याचे काम करतात. मंगळवारी रात्री ते मोशी येथील काजळे पंपावर रिक्षामध्ये सीएनजी भरण्यासाठी गेले. सीएनजी भरताना त्यांचे आरोपींसोबत भांडण झाले.

दोघांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून काठीने, दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.