Pimpri News : आरोग्याविषयी जनजागृतीसाठी तंबाखू, सिगारेट, बिडी, गुटख्याची पेटविली होळी

एमपीसी न्यूज – आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने तंबाखू, सिगारेट, बिडी, गुटखा, पान मसाल्याची आज (गुरुवारी) प्रतिकात्मक होळी करण्यात आली.

राष्ट्रवादी युवती संघटना व युवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीसाठी धुम्रपानाची प्रतिकात्मक होळी संत तुकारामनगर येथे आज दुपारी दोन वाजता शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच वर्षा जगताप यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती.

यावेळी मायला खत्री, राजेंद्र भूते, पोर्णिमा कोल्हे,नेहा पडवळ,मेघना जगताप, प्रतिक अलिबागकर,चैतन्य सपकाळ,अमन शिकलगार,प्रज्वल जगदाले, आशीष शितोले,गौरव ढोरे,प्रथमेश जगताप, पवन गायकवाड,गणेश गायकवाड,वेदांत जगताप,सौरव ढेरे,साहिल जाधव,सुरज जाधव,रितेश बुरुड,मिथिल खांडेकर,अनुराग अभंग,यश मोरे,दुर्वेश मालुसरे,अस्लम शेख,आदित्य समिंद्र,प्रथमेश गायकवाड यासह पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.