Chinchwad crime news : संभाजीनगर येथे महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज : संभाजीनगर, चिंचवड येथे दोन चोरट्यांनी दुचाकीवरून पतीसोबत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 15) रात्री सव्वानऊ वाजता घडली.

विनोद सोपान चिकणे (वय 29, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी स्वाती मंगळवारी रात्री घरातील सामान आणण्यासाठी बाहेर गेले होते. रात्री सव्वानऊच्या सुमारास ते दुचाकीवरून घरी येत असताना संभाजीनगरमधील रामेश्वर मंदिराजवळ एका केटीएम दुचाकीवरून दोन चोरटे आले.

त्यांनी फिर्यादी यांच्या पत्नीच्या गळ्यातील 35 हजार रुपये किमतीचे एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.