Chinchwad : साडेतीन महिन्यात नऊ टोळ्यांना ‘मोक्का’चा दणका

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील संघटीत गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. चालू वर्षात नऊ गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. त्यात 42 गुन्हेगारांचा समावेश आहे. 

 

लोकसभा निवडणुका भयमुक्त,शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी (Chinchwad) पोलिसांनी प्रतिबंधक कारवायांचा जोर वाढवला आहे. लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे, जाणूनबुजून जीवित व वित्तहानीसारखे गुन्हे करणाऱ्यांची कुंडली काढून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत. चालू वर्षात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नऊ टोळ्यांमधील 42 आरोपींवर मोकाअंतर्गत कारवाई केली आहे.

 

राहुल पवार टोळीवर मोका

टोळीप्रमुख राहुल संजय पवार (रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड), अमर नामदेव शिंदे (वय 28, रा. कासार आंबोली, ता. मुळशी), नितीन पोपट तांबे (वय 34, रा. मोशी), अभिजित उर्फ अभी चिंतामण मराठे (रा. जय भवानी नगर, कोथरूड), आसिफ उर्फ आशु हैदर हाफशी (रा. कासारवाडी) या टोळीवर मोका लावण्यात आला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा तपास करताना आरोपींनी संघटीतपणे सात गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी महाळुंगे एमआयडीसी, चाकण, एमआयडीसी भोसरी, सांगवी, पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, खंडणीसाठी अपहरण, जबरी चोरी, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत.

 

Charholi: वहीवाटीचा रस्ता बंद करत दमदाटी केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

चालू वर्षात मोक्का लावलेल्या टोळ्या

 सुरज किरवले टोळी (पिंपरी) (4 आरोपी)

रोहित खताळ टोळी (वाकड) (12 आरोपी)
अमन पुजारी टोळी (निगडी) (3 आरोपी)
राहुल यादव टोळी (चिखली) (5 आरोपी)
पवन उजगरे टोळी (भोसरी) (3 आरोपी)
आदित्य उर्फ निरंजन अहिरराव टोळी (वाकड) (3 आरोपी)
निलेश रेनवा टोळी (चिखली) (4 आरोपी)
आदर्श उर्फ कुक्या जगताप (भोसरी) (3 आरोपी)
राहुल पवार टोळी (महाळुंगे एमआयडीसी) (5 आरोपी)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.