Nigdi : घरात घुसून महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज – घरात घुसून महिलेला महिलेने मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 6) सकाळी प्राधिकरण निगडी येथे घडली. (Nigdi)

याप्रकरणी मारहाण झालेल्या महिलेने मारहाण करणाऱ्या महिलेच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PCMC : महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा दर गुरूवारी ”सायकल टू वर्क थर्सडे” उपक्रम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने आरोपी महिलेची गाडी ओली केली आणि त्यांच्या मुलीला भिजवले असा आरोपी महिलेचा समज होता. त्यातून ती फिर्यादी महिलेच्या घरात अनधिकृतपणे आली. तिने फिर्यादी महिलेला हाताने मारहाण करून शिवीगाळ करत दमदाटी केली. फिर्यादी यांच्या चष्म्याचे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.