Rising star Jayesh Bhor : उभारता बालकलाकार जयेश भोर

एमपीसी न्यूज (जयश्री कुलकर्णी) – ठाण्याचा छोटा जयेश भोर हा बाल कलाकार सध्या अँड टीव्हीवर सुरू असलेल्या महानायक बाबासाहेब आंबेडकर या मालिकेत भीमराव यांचा भाचा विनायक याची भूमिका साकारताना दिसत आहे.

स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत बाल संभाजी, जय जय स्वामी समर्थ मालिकेत बाल श्रीराम, घेतला वसा टाकू नको मधे भक्त प्रल्हाद, तुझ्या इश्काचा नाद खुळा मधील छोटा रघु अशा दमदार भूमिका साकारणाऱ्या जयेशने मराठी व हिंदी सिनेमे ही केले आहेत.

पार्ले बिस्कीट, हेम अगरबत्ती, सोनी सदन या जाहिरातींमध्येही तो दिसला. लिटिल चॅम्प्सचे प्रमोशनही केले आहे.

& टीव्ही चॅनल वर सुरु असलेल्या महानायक बाबासाहेब आंबेडकर या मालिकेत तो विनायक ही भूमिका साकारत आहे. जयेश हा फक्त सात वर्षांचा असून त्याला उत्तम अभिनयाची जाण आहे. सध्या तो शूटिंग मधे व्यग्र आहे.

जयेश इयत्ता दुसरीत शिकत असून इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी आहे. चांगले पाठांतर आणि स्मरणशक्ती लाभली आहे. नर्सरीत शिकत असताना त्याने फॅन्सी ड्रेस स्पर्धा जिंकली. वयाच्या पाचव्या वर्षी अभिनयाची चुणूक दाखवली.तीन नाटकांमधून अभिनय केल्यानंतर त्याची निवड स्वराज्य जननी जिजामाता सीरियलमधे बाल संभाजी ही भूमिका मिळाली. त्याचे वडील इलेक्ट्रॉनिक्स जॉब करत असून आई गृहिणी आहे.

महानायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही सीरियल सध्या सुरू आहे. त्यात 20 जुलैपासून मोठे बाबासाहेब दिसणार आहेत.

जयेशला त्याच्या भूमिकेसाठी आणि पुढील करिअर साठी खूप खूप शुभेच्छा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.