Gopalrao Kalamkar : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वंयसेवक, भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते गोपाळराव कळमकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुन्या पिढीतील स्वंयसेवक, चिंचवड मधील भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते गोपाळराव कळमकर तथा गुरुजी (Gopalrao Kalamkar) यांचे वृद्धपकाळाने आज (बुधवारी) निधन झाले. त्यांचे वय 83 होते.

गोपाळराव कळमकर हे गुरुजी या नावाने सर्वांना परिचित होते. त्यांनी पोस्ट कार्यालयात नोकरी केली. नोकरीनंतर पौरोहित्याचा व्यवसाय सांभाळून एक संघ स्वंयसेवक ही बिरुदावली मागे लावून अखेर पर्यंत कार्यकर्त्यांच्या भुमिकेत वावरले. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघ स्वंयसेवक होते. भारतीय मजदूर संघाचेही त्यांनी काम केले. (Gopalrao Kalamkar) चिंचवडगाव भाजपचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. भाजपचे जुन्या पिढीतील निष्ठावान कार्यकर्ते अशी त्यांची शेवटपर्यंत ओळख राहिली. त्यांना मधुमेहाचा आजार होता. काही दिवसांपासून ते घरीच असायचे. आज दुपारी वृद्धपकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज रात्री अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

PMPML : पीएमपीएमएल कडून बाजीराव रोड, शिवाजी रोडमार्गे जाणारे सात मार्ग पूर्ववत सुरू होणार

भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते महेश कुलकर्णी म्हणाले, “गोपाळराव ( काका ) कळमकर तथा गुरुजी हे नोकरीनंतर पौरोहित्याचा व्यवसाय सांभाळून एक संघ स्वंयसेवक ही बिरुदावली मागे लावुन अखेर पर्यंत कार्यकर्त्यांच्या भुमिकेत वावरले. (Gopalrao Kalamkar) त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे लहान थोरांबरोबर सरमिसळ होऊन सदैव कार्यात रममाण व्हायचे. पद असो वा प्रतिष्ठा याच्या काही कोस अंतरावरच ते राहिले. समाजहितापेक्षा सामाजिक बांधिलकीला महत्व देणारे ते होते. त्यांच्या स्वभावाचा अनेकांनी गैरफायदा घेतला. तरीही गैरसमजातुन वैफल्यता कधी ही त्यांच्या मनाला शिवली नाही. त्यामुळेच तर जिवनात गोपाळकाल्याचा आनंद त्यांनी मनसोक्त घेतला.

निष्ठेचे व्रत घेवुन सातत्याने सहकार्याच्या भुमिकेत राहण्याच्या सदैव सहभागामुळे अनेकांचे आदरणीय काका म्हणुनच जगले.(Gopalrao Kalamkar) स्वहितापेक्षाही सामुहिक कामाला गतिमान करण्याची त्यांची वृती कार्यकर्त्याना प्रेरणादायीच राहील. निस्पृह , निष्कलंक आणि मेहनती गोपाळराव काका गुरुजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.