Sahityavedi Website : मराठी भाषेची माहिती देणाऱ्या ‘साहित्यवेदी’चे सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज – मराठी भाषेची एकत्रित माहिती देणारे ‘साहित्यवेदी’ हे संकेतस्थळ चार उच्च माध्यमिक शिक्षकांनी विकसित केलं आहे. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.

जगभरातील मराठीप्रेमींना मराठी भाषेची माहिती ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध होणार असल्याबद्दल देसाई यांनी आनंद व्यक्त केला.

डॉ. सुजाता शेणई, शीतल सामंत, डॉ. पांडुरंग कंद व नानासाहेब जामदार या पाठ्यपुस्तक अभ्यासगट सदस्यांनी ‘साहित्यवेदी’ हे संकेतस्थळ तयार केले आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील हे प्राध्यापक आहेत.

_MPC_DIR_MPU_II

मराठी भाषा मंत्री देसाई म्हणाले, हे संकेतस्थळ शालेयस्तर ते संशोधक, अभ्यासक यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मराठी भाषा आणि साहित्याला उज्ज्वल परंपरा आहे. मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी शिक्षकांनी केलेला हा स्तुत्य उपक्रम असल्याचे देसाई यांनी सांगितले.

मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी www.sahityavedi.com या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.

विविध प्रकारचे कोश, शब्दांची व्युत्पत्ती, मराठी भाषेविषयीचे डॉ. गणेश देवी, डॉ. नीलिमा गुंडी, हरी नरके, डॉ. विद्या देवधर यांच्यासह अनेकांचे अभ्यासपूर्ण लेख, सुलेखन, वाङ्मयीन नियतकालिके, युवा साहित्यकार, भाषा आणि बोली यांचा संबंध, सार्वजनिक ग्रंथालये आणि साहित्य परिक्रमा यासारख्या विविध विषयांचा अंतर्भाव दृक्-श्राव्य फितींसह यात केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.