Bhosari : सेल्समनने केला दीड लाखांचा अपहार

एमपीसी न्यूज – दुकानातील मालाची परस्पर विक्री करून सेल्समनने दीड लाखांचा अपहार केला. हा प्रकार  एप्रिल 2016 ते  जुलै 2017 या कालावधीत भोसरी येथे घडला. 


शाहबाज रशिद मुतवली (वय-25, रा. ज्योतिबानगर, काळेवाडी) याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मालक मयूर पोपटलाल पगारीया (वय-39, रा. कासारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी पगारीया यांचे नाशिकरोड येथे श्री प्रकाश मल्टी ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात मुतवली सेल्समन म्हणून कामाला होता. त्याने एप्रिल 2016 ते जुलै 2017 या कालावधीत मालाची परस्पर विक्री करून दिड लाखांचा अपहार केला.  पोलीस निरीक्षक व्हि. डी. देशमुख अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.