Samruddhi Mahamarg Accident : पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात;12 जणांचा मृत्यू तर 23 जण जखमी

एमपीसी न्यूज – समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण ( Samruddhi Mahamarg Accident) अपघात झाला आहे. देवदर्शन करून परत येत असताना झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 23 जण जखमी झाले आहेत.

समृद्धी महामार्गावर वैजापूर येथील अगरसायगाव परिसरात रात्री 12.30 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला . नाशिक येथील इंद्रानगर येथे राहणारे जवळपास 35 भाविक  खाजगी टम्पो ट्रॅव्हल्सने बुलढाणा येथे बाबा सैलाणीच्या दर्शनासाठी गेले होते.

Worldcup 2023 : भारतीय संघाने पाकिस्तानवर मिळवला दणदणीत विजय

समृद्धी टोल नाक्यावर पोलिस एक ट्रक थांबवण्यासाठी, बाजूला घेत होते. त्याच वेळेस मागून आलेल्या या टेम्पो ट्रॅव्हलरने ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

यामध्ये 12 जणांचा  मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका 6 वर्षांच्या चिमुकलीचा देखील समावेश आहे  तर  अन्य 23 जण जखमी झाले.

अपघातानंतर तत्काळ वाहतूक पोलीस प्रशासनाने मदतकार्य सुरु केले. जखमींना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात ( Samruddhi Mahamarg Accident) आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.