Ghatasthapana : आजपासून नवरात्रीला सुरुवात…जाणून घेऊया घटस्थापनेबद्दल…

एमपीसी न्यूज – नवरात्रात देवीची  सरस्वती,  लक्ष्मी आणि दुर्गा  (Ghatasthapana) अशा विविध रुपात पूजा केली जाते. ही सर्व ज्ञान, समृद्धी आणि शक्तीची प्रतीके आहेत. यांच्या रूपातून आपण प्रत्यक्षपणे त्या शक्तींची पूजा करतो. संपूर्ण भारतात नवरात्र साजरी केली जाते. प्रत्येक ठिकाणी नवरात्र साजरी करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, पण त्यातली श्रद्धा मात्र एकसारखीच आहे.

घटस्थापना 

ठिकठिकाणी घटस्थापना  करण्याची परंपरा वेगळी आहे.घटस्थापना करण्यासाठी एक (Ghatasthapana) बांबूच्या काड्या पासून बनवलेल्या टोपलीमध्ये माती भरली जाते. या मातीमध्ये पाच किंवा नऊ प्रकारचे धान्य टाकतात. त्यावर रोज थोडे थोडे पाणी शिंपडून शेवटी त्याची रोपे तयार झालेली दिसून येतात. माती टोपलीत व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर यामध्ये एक तांबे या धातूचा तांब्या ठेवला जातो. या तांब्यामध्ये पाच विड्याची पाने किंवा आंब्याचा पाने गोलाकार ठेवतात आणि त्यावर नारळ ठेवतात व घटाची पूजा केली जाते.

Samruddhi Mahamarg Accident : पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात;12 जणांचा मृत्यू तर 23 जण जखमी

पहिल्या दिवशी घ़टाला नागवेलीच्या पानांची (विड्याच्या पानांची) माळ घातली जाते. प्रत्येक दिवशी या घटाची पूजा करून त्यावर रोज नवीन फुलांची माळ चढवली जाते. ग्रामीण भागात माळी येऊन या माळा देऊन जातो. माळी देईल त्या माळा देवीला घातल्या जातात. एखाद्या दिवशी माळी आलाच नाही, तर त्या दिवशी झेंडू, तरवट, चंदन, तुळस यांच्या पानांची माळ घातली जाते.

देवीच्या या घटाजवळ दहा दिवसांसाठी अखंड  दिवा लावला जातो. हा दिवा अखंड तेवत राहण्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. अश्या प्रकारे घटस्थापना केली जाते. शेवटच्या दिवशी घटाची विधिवत पूजा करून त्याचे विसर्जन केले जाते. यालाच घट उठवणे असेही म्हटले जाते.

नवरात्रात  नऊ दिवस उपवास का केले जातात ?

नवरात्रात उपवास नऊ दिवसांचेच असतात. यातील प्रत्येक उपवासाला माळ असेही म्हटले जाते. याबाबत सुद्धा एक पौराणिक कथा आहे. पार्वतीला गेंदण फुल हवे होते. हे गेंदण फुल खूप दूरवर आणि अडचणींच्या ठिकाणी होते. पार्वतीने शंकराकडे हे फुल आणण्याचा हट्ट केला. या हट्टापायी पार्वतीने अन्नपाणी त्यागून उपवास करण्याचा निश्चय केला. पार्वतीचा हट्ट पुरविण्यासाठी शंकर गेंदण फुल आणायला गेला. शंकर नऊ दिवसांनी म्हणजेच दशमीच्या दिवशी फुल घेऊन आले. त्यानंतर पार्वतीने रुसवा सोडून उपवास (Ghatasthapana) सोडला. त्यामुळे नऊ दिवस उपवास केले जातात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.