Sangavi : अगोदर वर्क फ्रॉम होमचे आमिष, नंतर 11 लाख 51 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – वर्क फ्रॉम होम करून (Sangavi) जास्तीत जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 11 लाख 51 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 11 सप्टेंबर ते 22 नोव्हेंबर या कालावधीत सांगवी येथे घडली.

याप्रकरणी 44 वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 62856466146220 हा क्रमांक धारक आणि cutshort HQ या कंपनीची एच आर महिला (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPSC Exam Schedule : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना वर्क फ्रॉम होम देऊन जास्तीचे पैसे कमावण्याचे आमिष दाखवले. (Sangavi) प्रथम गुगलवर काही लोकेशनला लाईक करण्याचे टास्क देत त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर टेलिग्राम ग्रुपवर इतर गुंतवणुकीचे पर्याय सांगून फिर्यादी कडून 11 लाख 51 हजार 984 रुपये घेत त्यांची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.