Sangavi news: उत्तरप्रदेश सामूहिक बलात्काराच्या घटनेचा युवक काँग्रेसकडून निषेध

एमपीसी न्यूज – उत्तरप्रदेश येथील हाथरसच्या बूलगाडी या गावामध्ये युवतीवरील सामूहिक अत्याचार व हत्याकांडाचा पिंपरी-चिंचवड शहर युवक काँग्रेसने आज (बुधवारी) निषेध केला. सांगवी येथील स्व.वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाजवळ मेणबत्ती प्रज्वलित करून पीडित युवतीस भावपूर्ण श्रध्दाजंली वाहण्यात आली.

युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, “ पीडित युवतीवर झालेल्या सामूहिक अत्याचार व हत्याकांडाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या घटनेचा करावा तेवढा निषेध कमी आहे. एवढी भयानक घटना घडूनही पोलिस प्रशासनाने दाखविलेली असंवेदनशिलता समाजात चीड निर्माण करणारी आहे. यावरून उत्तर प्रदेशातील योगी सरकारचा खरा चेहरा समोर येतो.

तसेच तेथील कायदा- सुव्यवस्थेची परिस्थिती यावरून स्पष्ट होते. यापुर्वी सुध्दा अशा दलित अत्याचाराच्या व हत्याकांडाच्या घटना तेथे घडल्या आहेत.

वास्तविक पाहता या भयावह परिस्थितीला सर्वस्वी जबाबदार असलेले मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांचे सरकार त्वरित बरखास्त करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी आम्ही करत आहोत. तसेच याबाबत त्वरित पीडित कुटूंबाचे पुनर्वसन करावे, अशी मागणी बनसोडे यांनी यावेळी केली.

या घटनेची न्यायलयीन प्रकिया जलदगती न्यायलयात करावी. याबाबत त्वरित अंमलबजावणी करण्यात आली नाही तर अधिक तीव्रतेने जनआंदेलन करण्यात येईल’, असा इशारा बनसोडे यांनी दिला आहे.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयचे उपाध्यक्ष उमेश खंदारे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष नासीर चौधरी, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, अनिल सोनकांबळे, गिरीधर माने, ओंकार पवार,श्रेयस बायत,ओम चौधरी, रोहित जगताप आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.