Sangavi : दाजीवर मेहुण्याने केले चाकूने वार

एमपीसी न्यूज – साथीदारांना घेऊन येत दाजीवर एका मेहुण्याने चाकूने वार करत लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. मुलाला सोडविण्यासाठी आलेल्या आईलाही पत्नीने हाताने मारहाण केली. ही घटना शिवप्रताप हौसिंग सोसायटी, जुनी सांगवी येथे घडली.

याप्रकरणी अभिजीत रणजितसिंग राजपुत (वय-35, रा. शिवप्रताप हौसिंग सोसायटी, पवार नगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रश्मी अभिजीत राजपुत (वय-28), अक्षय चतुरसिंग परदेशी (वय-20, दोघेही रा. परदेशी वाडा, देहूगाव) यांच्यासह आणखी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रश्मी अभिजीतची पत्नी आहे. तर अक्षय मेहुणा आहे. पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. याच वादातून आरोपी अक्षयने शुक्रवारी फिर्यादी यांच्या घरी येऊन चाकूने कानाजवळ, गालावर वार केले. तसेच त्याच्या साथीदारांनी फायटरने डाव्या डोळ्याजवळ मारून लाकडी दांडक्याने, कुलूपाने मारहाण केली. फिर्यादी यांची आई भांडणे सोडविण्यासाठी आली असता आरोपी रश्मीने त्यांनाही हाताने मारहाण केली. सांगवी पोलिस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.