Sangvi News : आरडाओरडा करून तिघांनी 96 हजारांचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज – दोन महिला आणि एका व्यक्तीने मोठमोठ्याने आरडाओरडा करून गोंधळ केला. तसेच महिलांचे दागिने हिसकावून मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 29) रात्री साडेनऊच्या सुमारासह जुनी सांगवी येथील शितोळे नगर परिसरात घडला.

याप्रकरणी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तेजस बाळासाहेब आंग्रे (वय 29, रा. गोखलेनगर, जनवाडी, पुणे) आणि अन्य दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.’

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तिघेजण फिर्यादी महिलेच्या घरासमोर आले. संतोष शितोळे कोठे आहे, अशी विचारणा करून आरोपींनी आरडाओरडा केला. त्यामुळे फिर्यादी घराबाहेर आल्या. संतोष येथे राहत नाही, काय काम आहे, असे फिर्यादी म्हणाल्या. त्या कारणावरून चिडून जाऊन तिघांनी शिवीगाळ केली. फिर्यादीच्या गळ्यातील 40 हजाराचे गंठण, त्यांच्या सासूचे 40 हजाराचे गंठण आणि भांडण्याच्या मध्ये पडलेल्या शेजारील महिलेचे मंगळसूत्र व 50 रुपयांचे पिवळ्या धातूचे मणी, असा 96 हजार 50 रुपयांचा ऐवज हिसकावून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.