Sangvi : घरफोडी करून सव्वातीन लाखांची चोरी

एमपीसी न्यूज – घरफोडी करून चोरटयांनी घरातून 3 लाख 25 हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 15) दुपारी नवी सांगवी येथे उघडकीस आली.

ज्ञानेश्वर एकनाथ येवले (वय 50, रा. गणेश नगर, नवी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानेश्वर कार्यक्रमानिमित्त शनिवारी (दि. 14) रात्री दहाच्या सुमारास बाहेरगावी गेले. दरम्यान त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप उघडून घरात प्रवेश केला. बेडरूममध्ये असलेल्या लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 3 लाख 25 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. रविवारी ज्ञानेश्वर घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.