Sangvi : गॅस सिलेंडरला आग; अग्निशमन विभागाच्या प्रसंगावधानामुळे धोका टळला

एमपीसी न्यूज – घरातील गॅस सिलेंडरला आग लागली. सिलेंडरला जोडलेल्या रेग्युलेटर जवळ ही आग लागली. गॅस लिकेज होत असताना देखील अग्निशमन विभागाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत आग विझवून रेग्युलेटर बाजूला केला. यामुळे मोठा धोका टळला. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी बाराच्या सुमारास जुनी सांगवी येथील शितोळे पेट्रोल पंपासमोर घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जुनी सांगवी येथील शितोळे पेट्रोल पंपासमोर असलेल्या एका घरात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरला आग लागली. ही आग सिलेंडरच्या रेग्युलेटरजवळ लागली. सिलेंडरमधून गॅस बाहेर येणे सुरु असल्याने मोठा स्फोट होण्याची शक्यता होती. अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन आणि रहाटणी अग्निशमन विभागाचे दोन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

किचन कट्ट्याखाली ठेवलेल्या गॅस सिलेंडरला रेग्युलेटरजवळ आग लागली होती. सिलेंडरमधून एकसारखा गॅस बाहेर पडणे सुरु होते. ब्लॅंकेटच्या साहाय्याने सिलेंडरची आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र सिलेंडर खाली पडल्याने आग विझवता आली नाही. त्यामुळे जवानांनी सुरुवातीला सिलेंडर पूर्णतः थंड केला आणि त्यानंतर ब्लॅंकेटच्या साहाय्याने आग विझवली. तसेच सिलेंडर मधून होणारी गॅस गळती बंद केली. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने संभाव्य धोका टळला, अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

सब ऑफिसर अरविंद मुळीक, फायरमन विजय घुगे, भूषण येवले, मिलिंद पाटील, संदेश ठाकूर, श्री होले, राठोड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.