Sangvi : विवाहितेच्या छळ प्रकरणी पती व सासूवर गुन्हा दाखल

आरोपी सासूने फिर्यादी विवाहीतेसोबत वारंवार शिवीगाळ करून भांडणे केली. : Husband and mother-in-law charged in marital harassment case

एमपीसी न्यूज – घरगुती कारणांवरून विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी विवाहितेने पोलिसात धाव घेत पती व सासूच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार पिंपळे सौदागर येथे घडला.

पती भार्गव महेश अय्यर, सासू भारती महेश अय्यर (दोघे रा. पिंपळे सौदागर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 28 वर्षीय विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सासूने फिर्यादी विवाहीतेसोबत वारंवार शिवीगाळ करून भांडणे केली. मुलगा भार्गव याला सासूने विवाहितेच्या विरोधात भडकावले.

त्यामुळे आरोपी भार्गव याने देखील विवाहितेला वेळोवेळी शिवीगाळ करून मारहाण केली. ‘तू मरून जा’ असे म्हणून शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.