Dighi : भरधाव दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकून दुचाकीस्वार ठार

हा अपघात 24 जुलै रोजी दुपारी चार वाजता मॅगझीन चौक ते दिघी रोडवर झाला. : two-wheeler by hitting a road divider

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणा-या दुचाकीची रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिव्हायडरला धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

हा अपघात 24 जुलै रोजी दुपारी चार वाजता मॅगझीन चौक ते दिघी रोडवर झाला. याबाबत 3 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्निल स्वप्नील बालाजी तिवारी (वय 19, रा. गायकवाडनगर, दिघी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जुलै रोजी दुपारी चारच्या सुमारास स्वप्नील मॅगझीन चौक ते दिघी या रोडने त्याच्या दुचाकीवरून (एमएच 12 / जेडी 4365) जात होता. दरम्यान, त्याने भरधाव वेगात दुचाकी चालवल्याने दुचाकीची रस्त्याच्या बाजूला असललेल्या कठड्याला जोरदार धडक बसली.

यात स्वप्निल गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. याबाबत स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा स्वप्निलच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.