BNR-HDR-TOP-Mobile

Sangvi : घरफोडी करत दागिन्यांसह टीव्ही आणि सिलेंडरही चोरला

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, एलईडी टीव्ही आणि सिलेंडर चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 13) सकाळी अकराच्या सुमारास पिंपळे गुरव येथे उघडकीस आली.राधिका बिपीन पांडे (वय 28, रा. भीमाशंकर कॉलनी, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधिका पांडे यांचे घर शनिवारी (दि. 12) रात्री आठ ते रविवारी (दि. 13) सकाळी अकरा या वेळेत कुलूप लावून बंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून दीड तोळे सोन्या-चांदीचे दागिने, एलईडी टीव्ही आणि एचपी कंपनीचा एक गॅस सिलेंडर चोरून नेला. रविवारी सकाळी राधिका घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4

.