Sangvi : कोंबडी कापू दिली नाही म्हणून ग्राहकाने केले थेट चिकन व्यावसायिकावर वार

एमपीसी न्यूज – जिवंत कोंबडीची मुंडी (Sangvi)कापू दिली नाही. या रागातून ग्राहकाने थेट चिकन सेंटरच्या चालकावरच दुकानातील कोयत्याने वार केले आहेत. ही घटना शनिवारी (दि.7) सायंकाळी जुनी सांगवी येथील समीर चिकन सेंटर येथे घडली.

याप्रकरणी सांगवी पोलिसांनी फिरोज अब्बास मुलाणी( वय 38 रा. दापोडी) याला अटक केली आहे. तर सांगवी पोलीस ठाण्यात चिकन दुकान व्यावसायिक मीराजुल सिराज शेख (वय 25 रा जुनी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे.

Dehugaon : फोनवर बोलत जाणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकावणाऱ्यास अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मुलांनी(Sangvi) हा फिर्यादी यांच्या समीर चिकन सेंटर येथे चिकन आणण्यासाठी गेला तेथे त्यांनी एक किलो चिकनची ऑर्डर दिली मात्र त्याने जिवंत कोंबडीची मुंडी मी कापतो अशी अजब मागणी केली.

यावेळी फिर्यादी यांनी मुलांनी सांगितले की आम्ही ग्राहकांना चिकन कापू देत नाही ते आम्ही स्वतः कट करून देतो याचा राग आरोपीला आला व त्याने थेट दुकानातील कोयता उचलून फिर्यादी यांच्यावर वार केले.

वार चुकवत असताना यात फिर्यादी यांच्या कानाला व तळ हाताला जखम झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी गेले व त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले याचा पुढील तपास सांगवी पोलीस करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.