Sangvi : देव्हाऱ्यातील दिव्यामुळे लागली आग

एमपीसी न्यूज – देव्हाऱ्यात तेवत असलेल्या दिव्यामुळे (Sangvi)घरामध्ये आग लागली. ही घटना रविवारी (दि. 8) दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडली.

अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास डॉ. निलिमा देसाई यांनी आगीबाबत माहिती दिली. त्यानुसार अग्निशमन दलाचे दोन बंब शुभश्री वुडस सोसायटी पिंपळे सौदागर येथे दाखल झाले.

Lonavala : लोणावळा धरणात बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह सापडले

अधिकारी विजय घुगे, विकास नाईक, कर्मचारी मंगेश देवगडकर, (Sangvi)संजय चव्हाण, अनिल वाघ,बापूसाहेब जाधव, अभिषेक भांगे, सचिन गरजे, अभिषेक साबळे, मयूर नवगिरे, सखाराम चिमटे, गणेश घोरपड, साईनाथ मिसाळ, अनिकेत घुगे, निखिल जगताप यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

घरातील देव्हाऱ्यात दिवा तेवत होत. त्यामुळे आग लागली असल्याचे समोर आले आहे. या घटनेत घरातील वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.