World cup 2023 :वर्ल्डकप मध्ये भारताची विजयी सलामी; ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय

एमपीसी न्यूज :- चेन्नई येथे चेपॉकच्या संथ खेळपट्टीवर (World cup 2023) प्रथम भारतीय गोलंदाजांनी जादू दाखवत ऑस्ट्रेलियाला 199 धावांवर रोखले, नंतर विराट कोहली आणि के एल राहुल यांच्या संयमी फलंदाजीने भारताला वर्ल्डकप मधील पहिले विजय मिळवून दिले.

वर्ल्ड कप 2023 मधील भारताने पहिले विजय साजरे केले असून पहिला सामनात भारताने ऑस्ट्रेलिया सहा गडी राखून धूळ चारले आहे. विराट कोहली आणि केल राहुल यांनी 2 धावांवर 3 विकेट्स या परिस्थितीतून भारताला सावरत चौथ्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी रचली आणि भारताला विजया समिप नेले.

Lonavala : लोणावळा धरणात बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह सापडले

विराट कोहली 12 धावांवर असताना त्याला(World cup 2023) मार्शने जीवनदान दिले. त्याचा फायदा उचलत त्याने सामन्याचे चित्र पालटले आणि 84 धावा केल्या. राहुलने नाबाद 97 धावा केल्या. त्याने शेवटपर्यंत किल्ला लढवत भारताच्या विजयावर शिकामोर्तत केले.

तत्पूर्वी भारताच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवत सर्वबाद 199 धावांवर रोखले, त्यामध्ये रवींद्र जडेजा 3 गडी, कुलदीप यादव 2 गडी, जसप्रीत बुमराह 2 गडी, हार्दिक पंड्या,मोहम्मद सिराज आणि रविचंद्रन आश्विन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share