Pune News : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना ‘या’ पद्धतीने मिळणार सानुग्रह मदत

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र शासनाद्वारे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना रु. 50,000  सानुग्रह मदत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने ऑनलाईन प्रणालीद्वारे प्राप्त अर्जांचे निराकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. सानुग्रह मदत वितरणासाठी प्राप्त झालेल्या अर्जांच्या अनुषंघाने अर्जदारांकडून प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यासाठी महापालिका क्षेत्रात तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. 

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह मदत देण्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे पुणे महापालिकेकडे आतापर्यंत 14,383 अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांपैकी 8771 अर्ज मंजूर झाले असून 2606 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.

दरम्यान, ज्या अर्जदारांना त्यांचा अर्ज नामंजूर केल्याबाबत संदेश आला असेल किंवा ऑनलाईन प्रणालीमध्ये अर्ज नाकारल्याचे दिसत असेल त्या सर्व अर्जदारांनी ऑनलाईन प्रणालीमध्ये ‘Appeal to GRC’ हा पर्याय निवडून तक्रार निवारण समितीकडे अपील करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.