Chinchwad News: बासरीवादनातून लता मंगेशकर यांना आदरांजली

एमपीसी न्यूज – स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानतर्फे बासरी वादक अजय वानखेडे यांच्या बासरीवादनातून भारतरत्न लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्यात आली. श्री स्वामी समर्थ सेवा मंदिर, शिवतेजनगर येथे गुरुवारी हा कार्यक्रम झाला.  बासरीवादक अजय वानखेडे यांच्या  मनमोहक बासरी वादन झाले.

भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांच्या विविध गाण्यांचे लयबद्ध बासरीतून सादरीकरण केले. उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध झाले होते
लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमासाठी पूर्णानगर,शिवतेज नगर, घरकुल, संभाजीनगर, शाहूनगर मधील नागरिक उपस्तिथ होते. श्री माजी नगरसेवक व स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.