Saurav Ganguly Hospitalized : प्रकृती बिघडल्याने सौरव गांगुली रुग्णालयात दाखल

एमपीसी न्यूज – बीसीसीआयचे अध्यक्ष ( BCCI President) सौरव गांगुली ( Saurabh Ganguly) यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे. आज दुपारी छातीत थोडं दुखू लागल्याने कोलकातामधील एका खासगी रुग्णालयात (Private Hospital) गांगुली यांना दाखल ( admitted)  करण्यात आलं आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. छातीत दुखू लागल्याने गांगुली यांना कोलकातामधील अपोलो रुग्णालयात (Apollo Hospital) दाखल करण्यात आलं असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, सौरव गांगुली यांना दोन जानेवारी रोजी हृदयविकाराचा झटका ( Heart Attack)  आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जिममध्ये व्यायाम करत असतानाच त्यांच्या डोळ्यापुढे अंधारी आली होती.

त्यानंतर गांगुली दक्षिण कोलकाता येथील वूडलँड ( woodland) या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर सात जानेवारीला गांगुली यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

प्रकृतीमध्ये वेगाने सुधारणा होत असल्याने त्यांच्यावर होणारी अ‍ॅन्जिओप्लास्टी( Angioplasty) पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like