Rashid khan : संगीत विश्वातील दुःखद बातमी; उस्ताद रशीद खान यांचे निधन

एमपीसी न्यूज – संगीत विश्वातील लखलखता तारा, उत्तुंग व्यक्तिमत्व (Rashid khan)उस्ताद राशीद खान यांचे वयाच्या 55 व्या वर्षी कोलकत्ता येथे निधन झाले आहे.

उस्ताद रशीद खान यांच्यावर 22 नोव्हेंबर पासून कोलकत्ता येथील(Rashid khan) पियरलेस रुग्णालयात उपचार सुरू होते.आज सायंकाळी रुग्णालयातच प्राणज्योत मावळली. 10 जानेवारी रोजी त्यांच्यावर कलकत्ता येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
उस्ताद राशीद खान यांना 2022 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उस्ताद राशीद खान यांच्या निधना नंतर शोक व्यक्त केले आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, उस्ताद राशीद खान यांच्या अंत्यसंस्कारा वेळी त्यांना बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात येणार आहे. त्यांच्या चाहत्यांना अंतिम दर्शन घेण्यासाठी राशीद खान यांचे पार्थिव रवींद्र सदन येथे ठेवण्यात येणार आहे.
करीना कपूर आणि शाहिद कपूर या जोडीने हिट केलेला ‘जब वी मेट’ या चित्रपटातील सदाबहार गझल ‘आओगे जब तुम ओ साजना’ हे गीत राशीद खान यांची कलाकृती आहे. ‘माय नेम इज खान’ या चित्रपटातील ‘अल्लाह ही रहेम, यासह ‘शादी मे जरूर आना’ या चित्रपटात ‘तू बन जा गली संग’ अशी गाणी त्यांनी गायली आहेत.
उस्ताद राशीद खान यांचा जन्म एक जुलै 19 68 साली उत्तर प्रदेशातील बदांयू येथे झाला. ते रामपूर सहसवन घराण्याशी संबंधित होते. या घराण्याचे संस्थापक प्रसिद्ध उस्ताद इनायत हुसेन खान हे उस्ताद राशीद खान यांचे आजोबा होते. 2006 साली राशीद खान यांना पद्मश्री आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार बहाल करण्यात आला होता. असे म्हटले जाते की, पंडित भीमसेन जोशी यांनी राशीद खान यांना भारतीय संगीताचे भविष्य म्हटले होते
https://www.youtube.com/watch?v=yiL5tv7B0bU&t=3s&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.