Bhosari : लहान भावासोबत भांडण झाल्याने दहा वर्षीय मुलाची आत्‍महत्‍या

एमपीसी न्यूज – खेळताना लहान भावासोबत झालेल्‍या भांडणानंतर (Bhosari )एका दहा वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे सोमवारी (दि. 8) दुपारी दीड वाजताच्‍या सुमारास घडली.

सार्थक संतोष सोनानेे (वय 10, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या मुलाचे नाव आहे.

वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्थक याचे आई–वडील दोघेही कामावर गेले होते. त्‍यावेळी घरी सार्थक आणि त्‍याचा लहान भाऊ खेळत होता. खेळताना त्‍यांच्‍यात भांडण झाले. त्‍यानंतर संतापलेल्‍या सार्थक याने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली.

Rashid khan : संगीत विश्वातील दुःखद बातमी; उस्ताद रशीद खान यांचे निधन

सार्थक याच्‍या लहान भावाने ही बाब शेजारी राहत असलेल्‍यांना सांगितली. शेजारी यांनी सार्थक याला खाली उतरवून त्‍वरीत रुग्‍णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्‍टारांनी घोषित केले. याबाबत भोसरी पोलीस ठाण्‍यात आकस्‍मात मृत्‍यूची नोंद करण्यात आली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.