Pune : डॉ. अमोल कोल्हे विरुध्द पार्थ पवार सामना रंगणार

एमपीसी न्यूज – आगामी शिरूर लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे (Pune)यांचा पराभव करणार म्हणजे करणारच अशी खूणगाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधली. त्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांचा हडपसर विधानसभा मतदारसंघातील दौरा महत्वपुर्ण मानला जात आहे.

दुसरीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेतर्फे (शिंदे गट) शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे खुद्द राष्ट्रवादी (अजित पवार गट) विरुद्ध शिवसेना असा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

Rashid khan : संगीत विश्वातील दुःखद बातमी; उस्ताद रशीद खान यांचे निधन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Pune)शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना चॅलेंज दिले आहे. अमोल कोल्हे यांच्या विरोधात आपण उमेदवार देऊ आणि निवडून आणू असं अजित पवार यांनी नि:क्षून सांगितले आहे. त्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार कोण उमेदवार देणार यावर चर्चा सुरू झाल्या आहेत.

अशातच अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे शिरूर लोकसभा मतदारसंघात अॅक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे पाटील यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

यावेळी त्यांनी माजी नगरसेवक बंडू गायकवाड यांचीही भेट घेतली. त्या प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी हा दौरा केल्याची कुजबुज आहे. गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार यांचा पुणे दौरा चर्चेचा ठरला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.