Pune : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरतांना सर्वाधिक मोठे शिष्टमंडळ – गोपाळ तिवारी

एमपीसी न्यूज – पुणे लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरतांना सर्वाधिक (Pune)आपलेच मोठे शिष्टमंडळ असल्याचा दावा काँगसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला आहे.

देशातील लोकशाही, स्वतंत्र्य व संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी (Pune)येणारी लोकसभा निवडणूक इंडिया आघाडीमधून काँग्रेस पक्ष लढवणार आहे.

पुणे शहराची जागा काँग्रेसकडे आहे. पुणे व महाराष्ट्रात अनेक वर्ष, युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व अ. भा. काँग्रेस महासमिती आणि पुणे मनपा सभासद नात्याने मी कार्यरत आहे. काँग्रेसची तत्वप्रणाली स्वीकारून निष्ठेने गेली 40 वर्ष मी काम करीत आहे. पुणे शहरात राजीव गांधी स्मारक समितीच्या माध्यमातून देखील कार्यरत आहे.

Wakad : वाकडमधील अनधिकृत बांधकामावर हातोडा

सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे देशात व राज्यात इंडिया आघाडीस नेतृत्व देत आहेत. हे अभिमानास्पद आहे.

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळीच विविध क्षेत्रातील जेष्ठ मान्यवर तसेच जेष्ठ काँग्रेसजन यांनी पक्षातील योगदान लक्षात घेता, पुणे लोकसभेसाठी काँग्रेस उमेदवारी करिता माझ्या नावाचा विचार होणे बाबत विनंती निवेदन देण्यात आले आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह पक्षश्रेष्ठी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही शिष्टमंडळाने भेटून निवेदन दिलेले आहे.

पुणे शहरातील जेष्ठ – तरुण कार्यकर्त्यांचा, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा, तसेच व्यक्तिगत मित्र परिवार यांच्या पाठिंबा व सहकार्य लक्षात घेता मी लोकसभा निवडणूक यशस्वीपणे लढू शकेन, हा आत्मविश्वास असल्याचे गोपाळ तिवारी यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.