Today’s Horoscope 10 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग -Today’s Horoscope 10 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – बुधवार.

तारीख 10.01.2024.

शुभाशुभ विचार – चातुर्दशी वर्ज्य.

आज विशेष – सामान्य दिवस.

राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आज नक्षत्र – मूळ 19.40 पर्यंत नंतर पूर्वाशाढा.

चंद्र राशी – धनु.

—————————–

मेष – ( शुभ रंग – सोनेरी)

आज नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाची साथ लाभेल. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. ज्येष्ठ मंडळी सत्संगात रमतील.

वृषभ- ( शुभ रंग- निळा)

आज जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. आपल्या कुवती बाहेर जबाबदाऱ्या स्वीकारूच नका. गोड बोल्या मंडळींपासून लांबच राहा. जोडीदार जे सांगेल ते योग्यच असेल.

मिथुन – ( शुभ रंग- जांभळा)

उद्योगधंद्यातील वाढत्या स्पर्धेस समर्थपणे तोंड द्याल. अडचणीत जोडीदाराची खंबीर साथ राहील. आज तुम्ही एखादा विवाह जुळवण्यास यशस्वी मध्यस्थी कराल.

कर्क – ( शुभ रंग – राखाडी)

नोकरदारांवर कामाचा वाढता ताण असेल. ध्येय साध्य करण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील. आज जोडीदार जे म्हणेल त्याला होच म्हणणे तुमच्याच हिताचे राहील.

सिंह – ( शुभ रंग – चंदेरी)

आज सौंदर्यप्रसाधनांचे व्यवसाय तेजीत चालतील. कला क्रीडा क्षेत्रातील मंडळी उत्कृष्ट कामगिरी करतील. उच्चशिक्षित मंडळींच्या महत्त्वकांक्षा वाढतील. आज प्रकृती उत्तम साथ देईल.

कन्या – ( शुभ रंग- मरून)

आज गृह सौख्याचा दिवस असून कौटुंबिक सदस्यांत खेळीमेळीचे वातावरण असेल. अत्यंत सकारात्मकतेने आजच्या दिवसाची सुरुवात कराल. आज तुम्ही गरजूंनाही मदत कराल.

तूळ – ( शुभ रंग- भगवा)

कार्यक्षेत्रात आज विरोधकांशी ही गोड बोलून आपला स्वार्थ साधून घ्यावा लागेल. आज बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील. आज आलेली कुठलीच संधी सोडू नका.

वृश्चिक – ( शुभ रंग – क्रीम)

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम राहील. एखाद्या महत्त्वाच्या बातमीने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. आज आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.

धनु – (शुभ रंग- हिरवा)

आज कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. जोडीदाराला अभिमानास्पद वाटणारी एखादी कामगिरी आज तुमच्या हातून घडेल.

मकर- ( शुभ रंग – पांढरा)

आज काटकसरी वृत्तीला थोडा लगाम घालून काही अनावश्यक खर्च करावेच लागणार आहेत. घरात थोरांच्या होला हो करून वाद आवरते घ्या. प्रवासात तब्येतीची काळजी घ्या.

कुंभ – (शुभ रंग- मोतिया)

एखाद्या नवीन उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. नोकरदारांच्या रास्त मागण्या वरिष्ठ मान्य करतील. वास्तू किंवा वाहन खरेदीसाठी कर्ज मंजूर होईल.

मीन -( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

कार्यक्षेत्रातील तुमच्या अतिवस्तते मुळे तुम्हाला कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागणार आहे. नोकरदारांना वरिष्ठांच्या मागेपुढे करावेच लागेल. अतिव्यस्त दिवस.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.