Science Park : शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केली सायन्स पार्कची पाहणी; सहकार्य करण्याची ग्वाही

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या सायन्स पार्क (Science Park) आणि तारांगण प्रकल्पाबाबतची माहिती आज (बुधवारी) महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सायन्स पार्कला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी दरम्यान घेतली. तसेच, शहरात उभारण्यात येणा-या विज्ञान आविष्कार नगरी (सायन्स सिटी) बाबतही त्यांनी माहिती घेऊन विविध सूचना केल्या. राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल असे आश्वासनही त्यांनी दिले.

खगोलशास्त्राच्या अभ्यासाकरिता शहरामध्ये चिंचवड येथील विज्ञान केंद्र उभारण्यात आले आहे. दरवर्षी सुमारे 3 लाखांवर विद्यार्थी व नागरिक सायन्स पार्कला भेट देत असतात. या ठिकाणी तारांगण उभारण्यात आले आहे. विज्ञान विषयक आणि खगोलशास्त्र  विषयक माहिती एकाच जागेत विद्यार्थी आणि नागरिकांना उपलब्ध व्हावी, यासाठी संपूर्ण भारत देशातील चार तारांगणांपैकी एक असलेल्या तारांगणाची उभारणी महापालिकेने केली आहे. यासोबतच आता शहरामध्ये विज्ञान आविष्कार नगरी (सायन्स सिटी)उभारण्यात येणार आहे.

Education Minister Deepak Kesarkar : मुंबईसह पिंपरी-चिंचवड महापालिकेत आमचीच सत्ता येणार

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सायन्स पार्क (Science Park) येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय आयुक्त सुहास दिवसे, महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा सचिव रणजितसिंह  देओल, समग्र शिक्षण  राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, राज्य शिक्षण सल्लागार डॉ. सतीश वाडकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सायन्स पार्कचे संचालक तथा माजी महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रविण तुपे, शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी, प्रशांत पाटील, उपआयुक्त संदीप खोत, रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, विशेष अधिकारी किरण गायकवाड, माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर थोरात, माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नव्याने विकसित होणाऱ्या सायन्स सिटी संदर्भात शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सायन्स पार्क येथे बैठक पार पडली. यावेळी सायन्स पार्कचे संचालक प्रविण तुपे यांनी या प्रकल्पाविषयी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी प्रस्तावित प्रकल्प उभारणीच्या अनुषंगाने जागेसंदर्भात माहिती दिली.

सायन्स सिटी विकसित करण्याचा महापालिकेचा प्रकल्प स्तुत्य असून याला मूर्त स्वरूप देण्यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल असे  आश्वासन शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी यावेळी दिले. या प्रकल्पाबाबत राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना माहिती देण्यासाठी संबंधित अधिका-यांनी प्रकल्प रचनेचे  सादरीकरण तयार करावे, अशी  सूचनाही त्यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.