Pune : पुण्यात वीज पडून कारने घेतला पेट

एमपीसी न्यूज – पुण्यात सुरु असलेल्या (Pune) तुफान पावसात एका कारवर वीज पडून कारने पेट घतला आहे. ही घटना विमाननगर येथील सिंबायोसिस जवळच्या मोकळ्या मैदानात आज (बुधवारी) दुपारी दोनच्या सुमारास घडली.

मोकळ्या मैदानात काही गाड्या पार्क केलेल्या होत्या. इतर गाड्या तेथून हालवण्यात आल्या होत्या. मात्र, पांढऱ्या रंगाची मारुती सुझूकी कार तेथेच होती. दरम्यान, गाडीवर अचानक वीज पडली व गाडीने पेट घेतला. आसपास रहिवासी परिसर असल्याने नागरिकांनी त्वरीत अग्निशमन दलाला फोन केला असता अग्निशमदलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली व त्यांनी त्वरीत ती आग विझवली.

Vadgaon Maval – विजेच्या लपंडावामुळे वडगावकरांचा पाणीपुरवठा विस्कळीत

याविषयी बोलताना अग्निशमन दलाचे अधिकारी (Pune) सोपान म्हणाले की, नागरिकांनी वीज पडून गाडी पेटल्याची वर्दी आम्हाला दिली होती. यामध्ये गाडी पूर्ण जळून खाक झाली आहे. मात्र, यात कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. तसेच, वेळेत इतर गाड्या तेथून हलवण्यात आल्याने मोठी हानी टळली, असे ही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.