Vadgaon Maval – विजेच्या लपंडावामुळे वडगावकरांचा पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज – वारंवार होणा-या विजेच्या लपंडावामुळे वडगाव शहराला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळे वडगावकर (Vadgaon Maval) नागरिक हैराण झाले असून विद्युतपुरवठा सुरळीत करण्याबाबतचे पत्र नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी वडगाव मावळ येथील उपकार्यकारी अभियंता यांना दिले आहे. वडगाव शहराला पाणीपुरवठा करणा-या जांभूळ धरणावरील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे, नगरसेवक राहुल ढोरे, प्रविण चव्हाण, चंद्रजित वाघमारे, दिलीप म्हाळसकर, माजी उपसरपंच विशाल वहिले, उद्योजक राजेश बाफणा, संदीप ढोरे आदि उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, वडगाव मावळ नगर पंचायत हद्दीत सुमारे 35 ते 40 हजार लोकसंख्या आहे. तसेच वडगाव मावळ हे तालुक्याचे मुख्यालय आहे. या ठिकाणी शहरानजीक जांभूळ गावाच्या नदीवर बंधारा आहे. तिथून शहराला पाणी पुरवठा होतो. परंतु गेल्या दीड महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला होणारा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.

Education Minister Deepak Kesarkar : मुंबईसह पिंपरी-चिंचवड महापालिकेत आमचीच सत्ता येणार

शहरातील (Vadgaon Maval) नागरिक त्रस्त असून नागरीकांच्या रोषास नगरपंचायतीस सामोरे जावे लागते. याची दखल घेऊन तात्काळ उपाय योजना करावी तसेच अतिरिक्त मनुष्यबळाची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात यावी व पाणी पुरवठा सुरळीत होईल याची दक्षता घ्यावी, असेही पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.