Chinchwad : किरकोळ कारणावरून सुरक्षा रक्षकास मारहाण

एमपीसी न्यूज – मेंढयांना चारण्यासाठी आणू नकोस असे म्हटल्यावरून दोघांनी मिळून सुरक्षा रक्षकाला काठीने मारहाण केली. ही घटना जिजाऊ पर्यटन केंद्र येथे शनिवारी (दि. 10) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

अनिल नारायण जगताप (वय 47, रा. भीमनगर, हिरामण नारायण जगताप चाळ, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल हे चिंचवड मधील जिजाऊ पर्यटन केंद्र येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. जिजाऊ पर्यटन केंद्रात मेंढ्या चारण्यासाठी आणू नकोस असे बजावून सांगितले असताना देखील दोघांनी त्यांच्या मेंढ्या चारण्यासाठी पर्यटन केंद्रात आणल्या. अनिल यांनी पुन्हा त्यांना सांगितले असता दोघांनी मिळून त्यांना काठीने मारहाण करत शिवीगाळ केली. यामध्ये अनिल जखमी झाले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.