Seva Vikas Bank : सेवा विकास बँकेच्या सर्व संचालकाची चौकशी करून कारवाई करा – डब्बू आसवानी

एमपीसी न्यूज –  सेवा विकास बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने दोन दिवसांपूर्वी रद्द केला. त्याला माजी अध्यक्ष ॲड. अमर मुलचंदाणी आणि त्यांचे सहकारी संचालक हे सर्वस्वी जबाबदार (Seva Vikas Bank) असून त्यांच्यावर सरकारने मोक्कांतर्गत कारवाई करावी. तसेच चाचणी लेखापरीक्षण अहवालातील 429 कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाची वसुली मूलचंदानी आणि व त्यांच्या सहकारी संचालक मंडळांकडून करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवडचे माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांनी केली आहे.

पिंपरी येथे बुधवारी (दि.१२) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डब्बू आसवानी बोलत होते. यावेळी उद्योजक श्रीचंद आसवानी उपस्थित होते.

डब्बू आसवानी यांनी सांगितले की, बँकेच्या संचालक मंडळाने मागील काळात केलेल्या बेकायदेशीर कर्ज वाटप आणि अनियमित व्यवहारांबाबत आम्ही वेळोवेळी  तक्रारी करून गैरव्यवहार उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्याची दखल घेऊन सहनिबंधक लेखापरीक्षण राजेश जाधवर यांनी (Seva Vikas Bank)  या बँकेचा चाचणी लेखा परीक्षण अहवाल सादर केला.  त्यात 429 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या कर्ज वितरणाबाबत विस्तृत नोंदी घेण्यात आल्या आहेत. हे कर्ज संशयितरित्या वाटप झाल्याचा आक्षेप नोंदविला आहे.

Sangvi crime : मुलीकडून आईला बेदम मारहाण

या बँकेवर मागील वर्षी रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध घालण्यात आले होते. प्रशासकाची नेमणूक करण्यात आली तरी देखील बँकेच्या कर्ज वसुलीत वाढ झाली नाही.(Seva Vikas Bank) परिणामी आरबीआयने बँकेचा परवाना रद्द केला आहे. या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड शहरातील या बँकेच्या सभासद, ठेवीदार यांच्या आर्थिक हिताला बाधा पोचली आहे. हजारो सभासदांचे आर्थिक नुकसान यामुळे झाले आहे. विशेषता पिंपरी परिसरातील व्यापारी आणि सिंधी बांधवांवर याचा दूरगामी प्रतिकूल परिणाम होणार आहे, असे डब्बू आसवानी यांनी सांगितले.

मूलचंदानी कोणताही उद्योग, व्यवसाय करत नसतानाही त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांच्या आलिशान मोटारी कोठून आल्या, याविषयीची चौकशी केंद्र सरकारच्या अंमलबजावणी संचलनालय (ईडी) व प्राप्तीकर विभागाने करावी तसेच अमर मूलचंदानी आणि त्यांचे सहकारी संचालक मंडळ यांची चल, (Seva Vikas Bank) अचल, स्थावर, जंगम मालमत्ता जप्त करून आणि त्यांची सर्व बँक खाती सील करून त्यांच्या सर्व संपत्तीची व बँकेतील खात्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी श्रीचंद आसवांनी यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.