Shahrukh Amir Kajol Trio: जाणून घ्या शाहरुखने आमीरला कोणता सल्ला दिला…

Shahrukh Amir Kajol Trio: Find out what advice Shah Rukh gave to Aamir 'दिलवाले' चित्रपटाच्या वेळी शाहरुखची मुलाखत घेण्यात आली. तेव्हा त्याने बाजीगर चित्रपटाच्या वेळचा किस्सा सांगितला.

एमपीसी न्यूज- आजही ‘राज-सिमरन’, ‘राहुल-अंजली’ म्हटल्यावर आपल्याला शाहरुखखान आणि काजोल लगेच डोळ्यासमोर येतात. एका पिढीला या चित्रपटांनी वेड लावलं होतं. या रोलसाठी आपण दुस-या कोणाची कल्पनासुद्धा करु शकत नाही. शाहरुख आणि काजोल यांच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीने एकेकाळी रुपेरी पडदा गाजवला होता.

त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करत अनेकांची मने जिंकली होती. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘बाजीगर’, ‘दिलवाले’ अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का, शाहरुखने आमिरखानला मात्र काजोलबरोबर काम न करण्याचा सल्ला दिला होता.

पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘दिलवाले’ चित्रपटाच्या वेळी शाहरुखची मुलाखत घेण्यात आली. तेव्हा त्याने बाजीगर चित्रपटाच्या वेळचा किस्सा सांगितला.

‘जेव्हा मी काजोलसोबत बाजीगर चित्रपटात काम करत होतो, तेव्हा आमिर खानने मला काजोलविषयी विचारले होते. त्याला काजोलसोबत काम करायचे होते.

मी त्याला त्यावेळी, ती चांगली अभिनेत्री नाही. तिचे कामावर लक्ष नाही. तू तिच्यासोबत काम करु शकणार नाही, असे सांगितले होते’, असे शाहरुख म्हणाला.

त्यानंतर मात्र शाहरुखला काजोलमधील टॅलेंट लक्षात आले. त्याने पुन्हा आमिरला पुन्हा फोन केला आणि काजोलच्या अभिनयाची प्रशंसा केली. ‘मी पुन्हा आमिरला फोन केला आणि त्याला आधी सांगितलेल्या गोष्टींवर पुन्हा बोललो. मला माहीत नव्हते ती स्क्रिनवर जादू करते’ असे शाहरुख म्हणाला.

मात्र यानंतर शाहरुखने एका मुलाखतीमध्ये त्याची मुलगी सुहाना खानने काजोलकडून अभिनयाचे धडे घ्यावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. काजोल एक अतिशय प्रामाणिक आणि चांगली अभिनेत्री आहे.

माझी मुलगी देखील अभिनेत्री होऊ इच्छिते. तिने काजोलकडून अभिनयाचे धडे घ्यावेत अशी माझी इच्छा आहे असे शाहरुख म्हणाला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.