Sharad Pawar Birthday : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या कोरोना योद्धयांचा गौरव सोहळा

एमपीसीन्यूज : माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका प्रज्ञा खानोलकर आणि माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांच्या वतीने उद्या, शनिवारी किवळे-विकासनगर येथे कोरोना योद्धयांचा गौरव करण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना कार्यक्रमाचे संयोजक मनोज खानोलकर म्हणाले, माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो.

मात्र, या वर्षी कोरोना संकट आले. त्यात अनेकांचे प्राण गेले. आर्थिक घडी विस्कळीत झाली. अनेकांचे रोजगार केले. कोरोना संकटातही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी कार्यरत असलेल्या डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार व सर्वसामान्य जनतेसाठी जीवनावश्यक मदत पोहोच करणाऱ्या कोरोना योद्धयांचे कार्य महान आहे.

त्यामुळे आमचे नेते श्री. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही संकटकाळात समाजासाठी योगदान देणाऱ्या कोरोना योद्धयांचा सन्मान करणार आहोत. हा सन्मान सोहळा शनिवारी ( दि. 12) सकाळी साडे दहा वाजता विकासनगर येथील नगरसेविका प्रज्ञा खानोलकर आणि माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.