Pimpri News : राज्य सरकारने तरुणांना बेरोजगारीच्या गर्तेत लोटले, निवडणुकीत अद्दल घडवतील – अजित गव्हाणे  

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यात बेरोजगारी किती प्रचंड प्रमाणात वाढली आहे याचे दाहक वास्तव महापालिकेच्या पद भरती प्रक्रियेने दाखवून दिले.(Pimpri News) महापालिकेने मागविलेल्या 386 पदांसाठी 1 लाख 30 हजारांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्याने बेरोजगारीचे विदारक चित्र समोर आले. इथली बेरोजगारी काही प्रमाणात कमी करू शकणारा ‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्प गुजरातच्या पायाशी वाहणाऱ्या कर्मदरिद्री शासनाला हे बेरोजगारच निवडणुकीत मतदानाच्या रूपाने अद्दल घडवतील आणि याची सुरुवात पिंपरी-चिंचवड शहरापासूनच होईल, अशी सडेतोड प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पत्रकाद्वारे दिली.  

पिंपरी-चिंचवड महापालिकेने विविध 386 पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले असता तब्बल 1 लाख 30 हजार 470 अर्ज प्राप्त झाले. बेरोजगारीच्या या दाहक वास्तवावर बोट ठेवत अजित गव्हाणे यांनी भाजपचा समाचार घेतला. ते म्हणाले की, पिंपरी -चिंचवड शहरासह राज्यात बेरोजगारीची दाहकता किती आहे त्याचे हे एक अत्यंत बोलके उदाहरण आहे. महापालिकेकडे आलेले सर्व अर्ज राज्यभरातील बेरोजगारांचे आहेत. वेदांत-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात असता तर यापैकी किमान 50 टक्के बेरोजगारांना नक्कीच नोकरीची संधी मिळाली असती. अशा शब्दात अजित गव्हाणे यांनी राज्य सरकारला आरसा दाखवला.

Pimpri Corona Update : शहरात आज 74 नवीन रुग्णांची नोंद; 81 जणांना डिस्चार्ज

बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दूरदृष्टीने आणि धडाकेबाज निर्णयांमुळे पिंपरी-चिंचवड शहर जगाच्या नकाशावर आले. (Pimpri News) टाटा, बजाज यासारख्या मोठ्या प्रकल्पांना पिंपरी -चिंचवड शहरात आणून इथेच रोजगारनिर्मिती करून दिली. तळेगाव, चाकण, रांजणगावातील औद्योगिकरण वाढवले. हिंजवडी, तळवडे, खराडीसारख्या आयटी पार्क्सने राज्यातीलच नव्हे तर देशभरातील युवकांच्या हाताला काम दिले. आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा पर्यायाने आपल्या राज्याचा इतका सखोल आणि संवेदनक्षम विचार करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी इथला प्रत्येक युवक ठामपणे उभा राहणार असा विश्वासही गव्हाणे यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी-चिंचवड शहरातील बेरोजगार युवा वर्गाला रोजगार उपलब्ध करून दिल्याचे येथील प्रत्येक सुजाण नागरिक मान्य करेल. (Pimpri News) त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपच्या भ्रष्ट कारभाराला विटलेल्या नागरिकांबरोबरच इथला संतप्त बेरोजगार युवावर्गही भाजप राज्यकर्त्यांना त्यांची खरी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत बेरोजगारांच्या उद्रेकाचा प्रत्यय नक्कीच मिळणार, असा विश्वासही गव्हाणे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.