Pimpri Corona Update : शहरात आज 74 नवीन रुग्णांची नोंद; 81 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 74 नवीन कोरोना बाधित (Pimpri Corona Update) रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 81 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 629 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.शहरातील 3 लाख 71 हजार 183 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 389 सक्रिय रुग्ण शहरात आहेत.(Pimpri Corona Update) त्यातील 382 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Ironmen felicitation : रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या वतीने आयर्न मॅन चा सत्कार

तर, केवळ 7 रुग्ण महापालिका  रुग्णालयामध्ये दाखल आहेत.(Pimpri Corona Update) आज दिवसभरात 772 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 72 हजार 857  जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.