Pimpri News: सरकार रिक्षा चालकांच्या बाजूने, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या शिष्टमंडळाला आश्वासन

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर दुचाकी व्यवसायाला कायदेशीर परवानगी नाही. याबद्दल मी परिवहन आयुक्त आणि व पोलिसांना योग्य ते आदेश दिले आहेत. बेकायदेशीर गोष्टींना आमचे समर्थन नाही. सरकार रिक्षाचालकांच्या बाजूने असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचे महाराष्ट्र रिक्षा पंचायतची अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत रिक्षा चालक मालकांच्या प्रश्नावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई मंत्रालय येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या वेळी उपमुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले असल्याची माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांच्या नेते अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. कृष्णा कराड रिक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गफारभाई नदाफ कार्याध्यक्ष रहीमभाई पटेल, सदाशिव तळेकर आदींसह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बाबा कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले की, रिक्षा चालक मालकांसाठी परिवहन विभागांतर्गत स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे. लॉकडाऊनमुळे रिक्षा चालक – मालक यांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यामध्येच ओला उबेरची बेकायदेशीर दुचाकी सुरु झाल्याने रिक्षा व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. हे दुचाकीचे ऍप बंद करण्यात यावे. कोविडनंतर रिक्षावाल्यांचे प्रश्न आणि समस्या या बाबत व ईतर विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड, पुणे शहरामध्ये बेकायदेशीरपणे दुचाकी सुरु असून ओला उबेरच्या या बेकायदेशीर ॲप मुळे रिक्षा व्यवसायावर मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झाला आहे. रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या विरोधामध्ये रिक्षा चालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्याच्याच निषेधार्था व विरोधात मोर्चा देखील काढला. कोविडमुळे अगोदरच मेटाकुटीला आलेल्या रिक्षाचालकांचे आर्थिक गणित बिघडलेले आहे. रिक्षा चालकांचे हप्ते थकले असून त्यांना हप्ते भरणे ही अवघड झाले आहे. या परिस्थितीत आलेल्या बेकायदेशीर दुचाकीमुळे आणखीन त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे हे ऍप बंद झाले पाहिजे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्र मोठ्यात संख्येने रिक्षा चालक मालक असून रिक्षाचालकांचे प्रश्न अत्यंत बिकट झाली आहे त्याबद्दल मला जाणीव असून मी रिक्षा चालक मालकांच्या प्रश्नाबद्दल लवकरच परिवहमंत्री, कामगार मंत्री व संबंधित अधिकारी यांची बैठक लावणार आहे. कोरोड नंतर रिक्षाचालकांचे कर्जाचे हफ्ते थकले असून फायनान्स कंपनीकडून त्यांना त्रास दिला जात आहे. त्यांच्या प्रश्नाबद्दल देखील सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.