गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

Potholes issue : अखेर शेलगाव ते वडगांव घेनंद रस्त्यावरील खड्डे प्रशासनाने बुजवले

एमपीसी न्यूज : शेलगाव(आळंदी खेड) येथील शेलगाव – वडगांव घेनंद  या ओढ्यावरील रस्त्यावर संततधार पावसामुळे मोठे खड्डे पडले होते.(Potholes issue)त्या खड्ड्यामुळे येथून रहदारी करणारे दुचाकी, चारचाकी वाहनधारत त्रस्त झाले होते.

Chinchwad news : शाश्वत विकास संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंचांचा सहभाग महत्वाच – गिरीष महाजन

शेलगाव ते वडगांव घेनंद रस्त्यावर खड्डे पडल्याचे वृत्त सर्वप्रथम एमपीसी न्यूजने 19 सप्टेंबर रोजी  प्रसारीत केले होते. त्यानंतर लगेचच दि.21 सप्टेंबर रोजी संबंधित प्रशासनाने तेथील मोठे खड्डे बुजवले असल्याचे (Potholes issue) निदर्शनास आले. तसेच वडगांव घेनंद ते शेलगाव येथील ठीक-ठिकाणी असणारे रस्यावरील खड्डे ही बुजवण्यात आल्याचे दिसून आले .खड्डे बुजवत असल्याची माहिती महेश कुऱ्हाडे यांनी दिली. खड्डे बुजवण्यात आल्याने या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी व येथील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

काम होण्या पूर्वीचा खराब रस्ता

काम झाल्यानंतरचा चांगला रस्ता

 

 

spot_img
Latest news
Related news