Shell-Pimpalgaon : चाकण शिक्रापूर रोडवर अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज : शेल- पिंपळगाव (Shell-Pimpalgaon) येथील चाकण शिक्रापूर रस्त्यावरील मार्गावर सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात जड-अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. तेथील पुलापासून काही अंतरावर असलेल्या रस्त्याच्या वळणाच्या कडेला मोठे जड वाहन बंद अवस्थेत असल्याने वाहतूक कोंडीत अजून भर पडली.

येथील वाहतूक कोंडीमुळे या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. या रस्त्यावरील वाहतूक कोंडीची दखल घेत वाहतूक पोलीस येथे येऊन येथील वाहतूक कोंडी सोडवण्याचे कार्य करताना दिसत होते. शिक्रापूर-चाकण रोडवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली.

Smart City : ‘स्वच्छता के दो रंग’ उपक्रमांतर्गत 6 हजार विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार व शासन गृह विभागाचे 19 मे 1990 च्या अधिसुचनेनुसार शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे अहमदनगर व शिक्रापूर चाकण रोडवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत तसेच सायंकाळी 4 ते 8 वाजेपर्यंतच्या कालावधीत अवजड वाहनांची वाहतूक 21 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत प्रायोगिक तत्वावर बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेश दिले आहेत.

परंतु, शेल-पिंपळगाव (Shell-Pimpalgaon) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावरील मार्गावरच 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 10 च्या दरम्यान मोठ्या प्रमाणात रस्त्यावर रहदारी करणाऱ्या जड- अवजड वाहनांमुळेच येथे वाहतूक कोंडी निर्माण झालेली दिसून आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.