Shikrapur Gang Arrested: भंगार व्यवसायिकाचे अपहरण करून दरोडा टाकणारी टोळी गजाआड

एमपीसी न्यूज : भंगार व्यवसायिकाचे अपहरण करून दरोडा टाकणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पकडले आहे. (Shikrapur Gang Arrested) याबाबत शिक्रापूर पोलूस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

करण उर्फ हनुमंत कांबळे, रा. सोळु, तालुका खेड,  रेहान खान, वय 32 वर्षे, रा. करंदी रोड गॅस फाटा शिक्रापूर, तालुका शिरूर, अमर दिवसे, वय 20 वर्षे, रा. आंबेडकर नगर, पूर्णा, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी, आकाश उर्फ डुब्या पानपट्टे, रा पूर्णा, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी, इम्रान खान, वय 30 वर्षे, रा. गॅस फाटा, खालसा ढाब्याजवळ, शिक्रापूर, मारी उर्फ सुरज खंदारे अशी या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यांना एक विधिसंघर्षित मित्राने व इतर साथीदारांनी या गुन्ह्यासाठी मदत केली होती. त्यांना ही ताब्यात घेण्यात आले आहे.

 

 

11 जुलैला रात्री 9.30 वा चे सुमारास शिक्रापूर चाकण रोडवरील भंगार व्यावसायिक अबूबकर खान, वय 19 वर्षे, रा. गॅस फाटा शिक्रापूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे याला अज्ञात इसमांनी त्यांच्याकडील पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कार मध्ये जबरदस्तीने बसवून त्याचे अपहरण केले होते.( Shikrapur Gang Arrested) तसेच त्याच्या खिशातील रोख रक्कम 57,000 रुपये व ऍप्पल कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण 87,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मारहाण करून जबरदस्तीने काढुन घेतला.  त्यानंतर या भंगार व्यावसायिक 12 जुलैला पहाटे अज्ञात स्थळी सोडून दिले. याबाबत शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी या प्रकरणी तपासबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या व त्यांच्या तपासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले होते.

 

गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की,  हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार करण उर्फ हनुमंत कांबळे, रा. सोळु, तालुका खेड याने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने स्विफ्ट डिझायर कारचा वापर करून केला. कांबळेला फुलगाव परिसरात चिंचबन हॉटेलच्या पाठीमागे शिवटेवाडी जवळ पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर सांगितले की त्याने त्याचे इतर साथीदार  रेहान खान, अमर दिवसे, आकाश उर्फ डुब्या पानपट्टे, इम्रान खान, मारी उर्फ सुरज खंदारे व त्यांचा एक विधी संघर्षित मित्र यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यामुळे त्याला व इतर साथीदारांना तुळापूर रोड चिंचबन हॉटेल परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

 

 

सराईत गुन्हेगार करण उर्फ हनुमंत कांबळे विरोधात चाकण पोलीस ठाण्यात 3 गुन्हे दाखल आहेत. तसेच
 दिघी पोलीस ठाण्यात, खेड पोलीस ठाण्यात व बीड पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.