Chinchwad News: क्रांतिवीर नागनाथअण्णा व प्रा.एन.डी. पाटील सर हे कायम प्रेरणादायी – काशिनाथ नखाते

 एमपीसी न्यूज: भारतीय स्वातंत्र्यानंतर समतेची दुसरी लढाई लढणारे शोषित, पीडित, अन्यायग्रस्त, विस्थापितांचा आधार बनून नागनाथअण्णानीं सहकार चळवळ वाढवली. धरणग्रस्त कोरडवाहू जमिनीच्या पाण्यासाठी लढे केले, साखर कारखान्यासह  शिक्षण संस्था निर्माण केल्या. (Chinchwad News) प्रा.एन.डी.पाटील सरांनी जन चळवळ फार मोठ्या प्रमाणात उभी करून परिवर्तन केले. वंचितांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे उभी करून एक मोठा आदर्श निर्माण केला. या दोन्ही महापुरुषाने समतेचा विचार जीवनभर अंगीकारला त्यांचे विचार नेहमी प्रेरक ठरतील असे मत कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज चिंचवड येथील कार्यालयामध्ये क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी व प्रा.एन.डी. पाटील सर यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रदेश संघटक विजय भोसले, कार्याध्यक्ष राजू बिराजदार ,सामाजिक कार्यकर्ते नाना कसबे, ओमप्रकाश मोरया ,येळुबाई  शिंगे, पवित्रा बनसोडे ,सीता सोनवणे , मंगेश पालके, रत्नमाला बनसोडे,सुवर्ण हाणवते, जयश्री लोखंडे ,छाया विचारे, निरंजन लोखंडे उपस्थित होते.

 

नागनाथअण्णा यांनी कायम परिवर्तनवादी विचार समाजासमोर ठेवले हुतात्मा किसन अहिर साखर कारखाना, हुतात्मा नानकसिंग विद्यालय, क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालय व दूध संघाची निर्मिती करून शेतकऱ्यांना सबल बनवण्याचे काम त्यांनी केले.  (Chinchwad News) इतक सर्व निर्माण करूनही ते कुठल्याही संस्थेचे अध्यक्ष झाले नाहीत हा त्यांचा मोठेपणा होता. दुष्काळग्रस्त भागाला पाणी मिळावे यासाठी अण्णांनी खूप मोठे प्रयत्न केले.

 

प्रा.एन.डी.सरांनी संपूर्ण आयुष्य समाज कल्याणासाठी व्यतीत केली . कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शिक्षण संस्थेची जबाबदारी स्वीकारून अनेक वंचितांच्या मुलांना शिक्षण दिले. कमवा व शिका योजना अधोरेखित केली. महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागाच्या लोकांसाठी समितीचे अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कार्य त्यांनी केले .शेतकऱ्यांचे आंदोलन ,कोल्हापूर टोलनाक्याचा लढा इतर सामाजिक प्रश्नावर त्यांचे कार्य हे कायमस्वरूपी अजरामर राहील. त्यांचे विचार नेहमी स्मरणात राहतील असे मत नखाते यांनी व्यक्त केले. प्रस्तावना तुषार जाधव यांनी केले तर आभार किरण पाटील यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.