Guru Purnima Celebration: प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी

एमपीसी न्यूज: : कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात मोठ्या उत्साहाने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. (Guru Purnima Celebration) या कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ.दिपक शहा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वनिता कुऱ्हाडे, बी.एड. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

 

Chinchwad News: क्रांतिवीर नागनाथअण्णा व प्रा.एन.डी. पाटील सर हे कायम प्रेरणादायी – काशिनाथ नखाते

यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सत्कार करून गुरुवंदना केली. यामध्ये विद्यार्थ्यांनी गायन, वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य सादर करून शिक्षकांचे मनोरंजन केले. तसेच,  कविता सादरीकरण व भाषणाच्या माध्यमातून गुरुमहत्त्व सांगितले. यामध्ये बी.एड व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होते. (Guru Purnima Celebration) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ वेचलेकर व प्रज्ञा कापसे या विद्यार्थ्यांनी केले. तर आभार प्रदर्शन हर्षा गवळी या विद्यार्थिनीने केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.