Shirgaon : तरुणाला विनाकारण मारहाण करत लुटले

एमपीसी न्यूज- एका तरुणाला दोघांनी (Shirgaon) विनाकारण मारहाण करत लुटले आहे. हा प्रकार रविवारी रात्री चांदखेड येथे कासारसाई चांदखेड रोडवर घडला.

याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी अभिजीत आबासाहेब मोरे (वय 19 ) व गोविंद गोकुळ सोनवणे (वय 21) दोघे राहणार वाल्हेकरवाडी यांना अटक केली आहे. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात गणेश जनार्धन ढाले (वय 23, रा चांदखेड) यांनी फिर्याद दिली आहे.

PMC : गणेश विसर्जनासाठी फिरत्या विसर्जन टाक्यांवरील खर्च म्हणजे नागरिकांच्या पैशांचा अपव्यय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कासार साई चांदखेड रोडवरील एका वॉशिंग सेंटरवर थांबले असताना आरोपी (Shirgaon) दुचाकीवरून आले. त्यांनी फिर्यादीला ही पॅशन प्रो गाडी कोणाची आहे म्हणून विचारले. यावेळी फिर्यादी यांनी ती मालकाची असल्याचे आरोपींना सांगितले.

हे ऐकताच आरोपींनी फिर्यादीला मारहाण करण्यास सुरुवात केली. असल्याने आरोपींनी त्यांच्या खिशातील पाच हजार रुपयांचा मोबाईल व त्यांची दुचाकी चोरून चोरटे पसार झाले. शिरगाव पोलिसांनी फिर्यादीनुसार आरोपींना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.