Shirgaon : चक्क 42 वर्षीय नागरिकाचे अपहरण; आठ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज : आर्थिक व्यवहारातून एका 42 वर्षीय नागरिकाचे अपहरण करण्यात आले (Shirgaon) होते. याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी आठ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. हि घटना गुरुवारी (दि.20) दुपारी शिरगाव येथे घडली.

बाबासाहेब आनंदा कुंभार (वय 42) असे अपहृत नागरिकाचे नाव असून त्यांच्या पत्नीने शिरगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी सचिन प्रतापराव नलवडे (वय 36), प्रताप संपत सावंत (वय 42), उमेश वसंत सावंत (वय 34), राकेश सुधाकर गवंडी (वय 28),रोहित सर्जेराव पाटील (वय 29), पोपट महादेव शिंदे (वय 33),मनोज महादेव पाटील (वय 28) सर्व रा. सांगली व अक्षय मोहन गायकवाड (वय 27 रा. मावळ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

Pimpri : पाणीपट्टीची 60 कोटी थकबाकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब कुंभार हे त्यांची नादुरुस्त स्कूटर दुरुस्तीसाठी घेऊन जात होते. यावेळी (Shirgaon ) पैशांच्या व्यवहारावरून आरोपीने त्यांचे अपहरण केले.

पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आठही जणांना अटक केली असून पुढील तपास शिरगाव पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.