Chinchwad : पैशांचा तगादा लावला म्हणून वृद्धाचे केले अपहरण, एकाला अटक

एमपीसी न्यूज – पैशाचा तगादा लावला म्हणून 70 वर्षीय वृद्धाचे अपहरण केले (Chinchwad) आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना 19 जुलेै रोजी चिंचवडगाव येथील केशवनगर येथे घडली आहे.

Shirgaon : चक्क 72 वर्षीय नागरिकाचे अपहरण; आठ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

याप्रकरणी पोलिसांनी नारायण बाबुराव इंगळे (वय 46 रा.चिंचवडगाव) याला अटक केली असून, राजेश नारायण पवार व त्याचा साथीदार समाधान ज्ञानोबा म्हस्के (दोघे रा. चिखली) यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. चिंचवड पोलीस ठाण्यात आदित्य पाकलपाटी (वय 39 रा.हैद्राबाद) यांनी शुक्रवारी (दि.21) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सासरे रणजित मेलासिंग (वय 70) यांनी आरोपी नारायणच्या  सासऱ्याकडे गुंतवणूक म्हणून 6 लाख दिले होते. ते पैसे रणजित यांनी परत मागितले. पैशांचा तगादा लावला म्हणून नारायण याने इतर दोन आरोपींना रणजित यांच्या अपहरणाची 4 लाख रुपयांची सुपारी दिली.

आरोपींनी 19 जुलै रोजी रणजीत यांचे  केशवनगर येथून कारमधून अपहरण केले.आरोपींनी खूनाच्या उद्देशाने अपहरण केले असा आरोप करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत (Chinchwad) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.