Shirgaon : शिरगाव आणि आळंदीत दारू भट्ट्यांवर पोलिसांचे छापे

एमपीसी न्यूज – शिरगाव आणि आळंदी पोलीस ठाण्याच्या (Shirgaon) हद्दीत सुरू असलेल्या अवैध दारू भट्ट्यांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी छापे मारले. यामध्ये साडेपाच लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. या कारवाया रविवारी (दि. 21) करण्यात आल्या.

शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट पाचने कारवाई केली. पवना नदीच्या काठावर एका महिलेने दारू भट्टी लावली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने कारवाई करत चार लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी महिला पळून गेली. या प्रकरणी पोलीस अंमलदार श्यामसुंदर गुट्टे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

Pune : अलौकिक परिवाराच्या वतीने आंतर चर्च हाप पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 

आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट तीनने कारवाई केली. मरकळ गाव येथे सुरू असलेल्या एका दारू भट्टीवर गुन्हे शाखेने रविवारी दुपारी छापा मारला. यामध्ये एक लाख रुपये किमतीचे दोन हजार लिटर कच्चे रसायन पोलिसांनी (Shirgaon) नष्ट केले. याप्रकरणी पोलीस अंमलदार योगेश्वर कोळेकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अफसाना रोहन राठोड (वय 18, रा. मरकळ) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.